सुके मुग वडे (कुरकुरीत) रेसिपी

 सुके मुग वडे (कुरकुरीत) रेसिपी

साहित्य:

२ कप भिजवलेले हिरवे मूग

२ हिरव्या मिरच्या

५–६ लसूण पाकळ्या

१ इंच आलं

१ टीस्पून जिरे




चिमूटभर हिंग

२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

मीठ चवीनुसार

२ टेबलस्पून तांदळाचे पीठ (कुरकुरीतपणासाठी)

तळण्यासाठी तेल

कृती:

भिजवलेले मूग पाणी न घालता जाडसर वाटून घ्या.

त्यात मिरची, आलं, लसूण, जिरे, हिंग, मीठ, कोथिंबीर आणि तांदळाचे पीठ घालून मिक्स करा.

कढईत तेल गरम करून लहान गोल किंवा चपटे वडे सोडा.

मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.

हे सुके वडे नारळाची चटणी, हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर खूप छान लागतात. 😊

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

साधी मसूर डाळ आमटी

घरच्या घरी अगदी मऊ, स्पॉंजी आणि चविष्ट दही वडे